मावळ (प्रतिनिधी): राज्यपातळीवरील सब ज्युनिअर,ज्युनिअर, सिनियर आणि मास्टर्स पावरलिफ्टींग स्पर्धा दि.10 ते 12 मार्च दरम्यान संपन्न झाली. समृद्धी लॉन्स नेऱ्हे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या कुमारी तपस्या मते हिने सुवर्णपदक मिळवत “स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्रा”हा बहुमान देखील मिळविला.
या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेच्या स्पर्धकांनी तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक, व एक चतुर्थ क्रमांक देखील मिळविला आहे.
यामध्ये मुलींमध्ये तपस्या मते, खुषी बडेला यांनी सुवर्ण पदक मिळविले. तर मुलांमध्ये सुनील सपकाळ याने सुवर्ण पदक मिळविले.तसेच रबिहा पाटका आणि सौ.ज्योती कंधारे यांनी रौप्यपदक मिळविले तर सौ.युगंधरा औसरमल यांनी देखील उत्तम कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळविला.
वरील राज्यस्तरीय स्पर्धेत कु.तपस्या अशोक मते हिने सलग दुसऱ्या वर्षी “स्ट्राॅन्ग वुमन ऑफ महाराष्ट्रा” हा बहुमान देखील मिळविला.