Tuesday, November 29, 2022
Homeपुणेराज्यातील 18 जिल्ह्यासहित 82 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा बदल...

राज्यातील 18 जिल्ह्यासहित 82 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा बदल…

पुणे : राज्यातील 18 जिल्हे व 82 तालुक्यांमधील ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार असून मतमोजणी 14 ऑक्टोबर ऐवजी आता 17 ऑक्टोबरला होईल , अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

दरम्यान , राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंबर 2022 रोजी या 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता . त्यात सदस्यपदांसह थेट सरपंच पदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या कालावधीत मतदान होईल . नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.

मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल . मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील , असेही निवडणूक आयोगाने प्रसिद्धि केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page