![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी): गोवा राज्य निर्मित गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरवर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमाटणे गावच्या हद्दीत कारवाई केली. ही कारवाई शनिवार दि.11 मार्च रोजी सायंकाळी 5:00 वा.च्या सुमारास सोमाटणे टोल नाका येथील हॉटेल सॉमटन समोर करण्यात आली.
या मध्ये वाहन चालक शंकरलाल नारायण जोशी (वय 46 वर्षे, व्यवसाय ट्रक चालक रा- जैन मोहल्ला, बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपूर राजस्थान ) या सह 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाचे पुणे या कार्यालयाच्या पथकामार्फत शनिवारी सायंकाळी सोमाटणे गावच्या हददीत,सोमाटणे हॉटेल सॉमटन समोर सापळा लावून गोवा राज्य निर्मीत व फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणारा कंटेनर ट्रक क्र.TN 69 BB 2170 यावर कारवाई करत तब्बल 86 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील विविध ब्रँडचे विदेशी दारू व बिअरचे बॉक्स मिळून एकूण 845 बॉक्स असा मुददेमाल मिळुन आला असून एकूण 65 लाख 90 हजार 160 रुपये किंमतीचा मुददेमाल भारत बेंझ कंपनीचा कंटेनर ट्रक या वाहनामध्ये मिळून आला.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक दिपक बा. सुपे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, आर. सी. लोखंडे तसेच जवान तात्याबा शिंदे, राहूल जोंजाळ, संजय गोरे आदींनी केली.सदर गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिपक बा. सुपे हे करीत आहेत.