मंत्री रवींद्र चव्हाण आणि महेंद्र शेठ थोरवे यांच्यात भांडण लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात दिवसेंदिवस शिवसेनेची ” ताकद ‘ वाढत आहे . आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गजांचा पक्ष प्रवेश होत असल्याने आगामी काळात त्यांचे ” हात ” मजबूत होत असताना राज्यातील महायुतीतील मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत मतदार संघात ” कुरघोडी ” करून ” विपर्यास ” करत असल्याचे दिसत असून यावेळी त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे हे ” कट कारस्थान ” जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी उधळून लावले.
नुकताच शिवतीर्थ – पोसरी कर्जत येथे सर्वच पक्षातील मान्यवरांचा हजारोंच्या संख्येने शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला , त्या मेळाव्यात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जत मतदार संघात महायुतीतील घटक मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ते करत असलेल्या विरोधी कामावर ” आगपाखड ” केली असता ती भाजपावर केली असल्याचा विपर्यास सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्याचे सांगून मंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यात भांडणे लावल्याचा प्रयत्न केला . मात्र हे कट कारस्थान वेळीच ओळखून रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी सोशल मीडियावर वेळीच प्रतिक्रिया व्यक्त करून विरोधकांचे ” डाव ” उधळून टाकले.
आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त करत असताना काही नेत्यांना कोकणचे भाग्यविधाते आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागले , असे विधान केले होते , मात्र ते विधान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वर ” निशाणा ” साधला असून हे विधान मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल नव्हते , ते आमचे नेतेच आहेत , त्यांचा आम्ही आदरच करतो , तर चारच दिवसांपूर्वी मंत्री रविंद्र चव्हाण व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची भेट झाली असल्याने भाजपाने देखील चुकीचा अर्थ काढू नये , त्यांच्यात कर्जत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याचे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी खुलासा देवून स्पष्ट केले आहे , तसेच विरोधकांनी लोकसभेला काम केलं नाही याची जाणीव सुद्धा जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांनी राष्ट्रवादीला करून दिली आहे . त्यामुळे राष्ट्रवादी करत असलेले कट कारस्थान जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी उधळून लावले .