राष्ट्रवादी करंडक 2022 चा प्रथम मानकरी प्रमिला स्पोर्ट्स फौंडेशन संघ !

0
208

वडगाव मावळ : वडगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आयोजित व नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या माध्यमातून आयोजित “राष्ट्रवादी करंडक 2022” चा प्रथम मानकरी प्रमिला राजेश बाफना स्पोर्ट्स फौंडेशन.

आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहराच्या वतीने तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या माध्यमातून “राष्ट्रवादी करंडक 2022” या दोन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा वडगाव मर्यादीत होती यामध्ये शहरातील अनेक संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. तसेच या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे ही स्पर्धा आंबी येथील डॉ.डी.वाय. पाटील या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळविण्यात आली.

सर्व स्पर्धकांमध्ये वडगावच्या प्रमिला राजेश बाफना यांच्या प्रमिला स्पोर्ट्स फौंडेशन या संघाने उत्कृष्ट खेळी खेळत “राष्ट्रवादी करंडक 2022” चा प्रथम विजेता हा मान मिळविला आहे.