मावळ : मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनिलआण्णा शेळके यांच्या वर झालेले आरोप तसेच समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भातखळकर यांच्या प्रतिमेवर जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
आण्णांच्या कर्तुत्वाची नाहक बदनामी सहन केली जाणार नाही. माननीय तहसीलदार साहेब यांना अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले,
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे,ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सुभाषराव जाधव,पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, नारायण ठाकर,साहेबराव कारके, पं.स.सदस्य कृष्णा दाभोळे, सुवर्णाताई राऊत, रुपालीताई दाभाडे, विणाताई करंडे,सविता मंचरे, सुनिल दाभाडे ,अतुल राऊत, नवनाथ चोपडे, आफताब शेख, कैलास गायकवाड, विक्की लोंखडे, अंकुश आंबेकर ,निलेश राक्षे ,तुषार काळोखे, अंजिक्य टिळे, संजय शेडगे इत्यादी मान्यवर निवेदन देताना उपस्थित होते, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी आपल्या भाषणात भातखळकर यांच्या वर फौजदारीची कारवाई करा अशी मागणी केली भाजपचे अशे लोक समाजात फुट पाडण्याचे काम करतात, मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विकासासाठी 800 कोटीचा निधी आणुन विकासाची कामे चालू आहेत, तसेच राष्ट्रवादी बद्दल खोट्या अफवा पसरवून नाहक बदनामी केली जाते यापुढे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून जशास तसे उत्तर दिले जाईल असे ते म्हणाले.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.