राष्ट्रवादी काँग्रेसच्या “सन्मान कार्यकर्त्यांचा..गौरव कर्तृत्वाचा “अंतर्गत तळेगावातील कार्यकर्त्यांचा सन्मान…

0
49

तळेगाव : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान सोहळा काल ईशा हॉटेल येथे संपन्न झाला. तसेच ‘सन्मान कार्यकर्त्यांचा… गौरव कर्तुत्वाचा’ या संकल्पनेनुसार शहरातील सर्व प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्षा दिपालीताई गराडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक सुरेश धोत्रे,सुरेश चौधरी,कृष्णा कारके, सुदर्शन खांडगे,दिलीप खळदे,अशोक भेगडे, चंद्रभान खळदे,गणेश काकडे,संतोष भेगडे, अरुण माने, विलास काळोखे,प्रतापराव भेगडे, रामभाऊ गवारी,नंदू कोतुळकर,संदीप आंद्रे, राज खांडभोर,किशोर सातकर,सचिन मुऱ्हे, समीर कदम, वि.म. शिंदे,दौलतराव भेगडे, तुषार भेगडे, सौ.मायाताई भेगडे,सौ.आरती घारे, सौ.संध्या थोरात, सौ.शालिनीताई खळदे, सौ.शैलजा काळोखे, सौ.अर्चना दाभाडे, विशाल पवार, आशिष खांडगे, विकी लोखंडे, हर्षद पवार, करण शेळके, आगळे दादा आदि मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.