Monday, June 23, 2025
Homeपुणेलोणावळाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा..

लोणावळा:( श्रावणी कामत) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10:10 वाजता ज्येष्ठ नेते रमेश चंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करून मान वंदना देण्यात आली.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात घोषणाबाजी करत 25 किलो लाडूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष नासिर शेख, महिला अध्यक्षा श्वेता वर्तक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद होगळे, ज्येष्ठ प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे, जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब फाटक, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सदस्य राजू बोराटी, तसेच नेहा पवार, गायत्री रिले, उषा राऊत, अजिंक्य कुटे, अजय गोदीया, आदिल शेख, फिरोज शेख, संतोष कचरे, किरण पाळेकर, अमोल गायकवाड, संतोष कांबळे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नासिर शेख यांनी ध्वजारोहणासाठी तसेच या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे प्रमुख, कार्यकर्ते, आणि माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page