राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव भेट दौऱ्यानिमित्त पक्षाच्या फलकांचे अनावरण…

0
30

मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गाव भेट दौऱ्याच्या पहिल्या दिवशी वाडिवळे, वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी,नेसावे,खांडशी,उंबरवाडी या गावांमध्ये पक्षाच्या फलकांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आणि ‘चला गावच्या समस्या जाणून घेऊया, आपल्या मावळला प्रगतीपथावर नेऊया’ या संकल्पनेनुसार प्रत्येक गावात जाऊन स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संवाद साधला.

या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक गावात जाऊन थेट ग्रामस्थांसोबत संवाद साधत असल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणी व शंका समजून घेता आल्या.अनेकांनी लेखी स्वरूपात निवेदने दिल्याने समस्येचे निराकरण करण्यास मदत झाली. काही गावांमध्ये विजेचे खांब, पानंद रस्ते, स्मशानभूमी, सभामंडप, अंतर्गत रस्ते यासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध केला जाईल. आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आणि घरकुल संबंधित तक्रारींसाठी शिबीर आयोजित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष लक्ष देऊन दर्जेदार रस्ते करण्यावर भर आहे.पाणी योजनांची कामे देखील सुरु आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी गावस्तरावर अधिक प्रयत्न करण्यात येईल. नागरिकांनी सुचविलेल्या कामांची व समस्यांची दखल घेऊन ती नक्कीच पूर्ण केली जातील,असा विश्वास यावेळी आमदार शेळके यांनी सर्वांना दिला.

यावेळी आमदार सुनील शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, नगरसेवक किशोर भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, संघटनमंत्री नारायण ठाकर, दिपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे,नाणे मावळ अध्यक्ष साईनाथ गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन मुऱ्हे, महिला अध्यक्षा सौ. दिपालीताई गराडे, युवती अध्यक्षा सौ.आरती घारे, ओबीसी सेल अध्यक्षा सौ.संध्याताई थोरात, कुलस्वामीनी महिला मंच अध्यक्षा सौ.सारिका शेळके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा सौ.पुष्पाताई घोजगे, कार्याध्यक्षा सौ.कल्याणीताई काजळे, देहु शहराध्यक्षा सौ.रेश्माताई मोरे आदि.मान्यवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच सरपंच, सदस्य, महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.