Tuesday, May 30, 2023
Homeपुणेकामशेतराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका कार्यकारिणी शिबीर संपन्न…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका कार्यकारिणी शिबीर संपन्न…

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मावळ तालुका कार्यकारीणी शिबीर 2023 रविवार दि.22 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत कामशेत येथील हिरकणी लॉन्स येथे संपन्न झाले.
संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून मार्गदर्शन शिबिरास सुरुवात करण्यात आली. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सुनील शेळके यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, दैनिक सकाळच्या संपादक सौ.शितलताई पवार, ओबीसी आरक्षण अभ्यासक हरीजी नरके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, इतिहास संशोधक प्रा.इंद्रजीतजी सावंत, प्रसिद्ध शाहीर राजेंद्रजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आदी मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

You cannot copy content of this page