राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी हर्षदा दुबे…

0
34

मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका क्रीडा सेलच्या अध्यक्षपदी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या हर्षदा दुबे जोशी यांची सोमवारी दि.9 रोजी निवड करण्यात आली असून त्यांना आमदार सुनिल शेळके , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , संघटनमंत्री नारायण ठाकर , राष्ट्रवादी महिला काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पा घोजगे , मंजुश्री वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

या वेळी आमदार सुनिल शेळके यांनी हर्षदा दुबे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच या महत्त्वपूर्ण पदाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व घटकांना योग्य न्याय द्यावा आणि तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशा देण्याचे काम करावे अशी आशा व्यक्त केली.