Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या लोणावळा शहराध्यक्ष पदी नासिर शेख यांची नियुक्ती..

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या लोणावळा शहराध्यक्ष पदी नासिर शेख यांची नियुक्ती..

लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या लोणावळा शहर अध्यक्ष पदी माजी नगरसेवक नासीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना सदर नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
लोणावळ्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात हे नियुक्ती पत्र देण्यात आले.
नासीर शेख हे भारतीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी तसेच लोणावळा शहर काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पदांचा व काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. ते लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असून मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत.
लोणावळा शहरातील सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वाढविण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page