Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जन जागर यात्रेचे लोणावळ्यात जल्लोषात स्वागत….

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जन जागर यात्रेचे लोणावळ्यात जल्लोषात स्वागत….

लोणावळा (प्रतिनिधी): राष्ट्रवादी महिला काँग्रेसची ‘जन जागर यात्रा’ शुक्रवार दि. 6 रोजी देहूगाव ते लोणावळा संपन्न झाली.महागाई, बेरोजगारीच्या विरोधात ही जनजागर यात्रा काढण्यात आली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राज्य निरिक्षक डॉ. आशा मिरगे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,गणेश खांडगे आदी मान्यवरांच्या उपस्थित लोणावळ्यात जनजागर यात्रेचे फटाक्याची आतिषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर,कार्याध्यक्ष रवी पोटफोडे,प्रवक्ता फिरोज शेख, युवक अध्यक्ष विनोद होगले, सनी पाळेकर, नारायण पाळेकर, राजू बोराटी, जयेश देसाई, जाकीर खलिफा,राजेश मेहता, महिला अध्यक्षा उमा मेहता,कार्याध्यक्षा संयोगिता साबळे, युक्ती अध्यक्षा गायत्री रिले, युक्ती कार्याध्यक्षा नेहा पवार, ओबीसी सेल अध्यक्षा सुजाता जाधव, शबाना शेख, नितु हुंडारे, भारती मराठे, अंजना कडू, माजी नगरसेविका आरोही तळेगावकर, शिला बनकर, निकिता मिश्रा, सीता गवळी, रंजना तिकांदे, अलिझाबेथ, पार्वती कोल्हापूरकर, दिपाली गवळी, गौरी वालेकर, पूर्वा गायकवाड आदीसह अनेक महिला कार्यकर्त्या व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या यात्रेच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, वेतन, बेताल वक्तव्य, शेतकरी असंतोष, महिला सुरक्षा, अशा सर्व विषयांवर यल्गार करण्यात आला.बेरोजगारी आणि महागाईमुळे जनता त्रस्त आहे. परंतु, सत्ताधारी पक्षांकडून जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर काम होत नाही. महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महागाई व बेरोजगारी च्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने या यात्रेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला.

You cannot copy content of this page