राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…

0
58

पिंपरी – चिंचवड: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड माजी शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय मुंबई येथे सदर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले .

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख , प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण , प्रदेश कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे आदी मान्यवर उपस्थित होते .

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना विशाल वाकडकर यांनी सांगितले , की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी -चिंचवड महापालिकेतील अनेक प्रश्न , समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे . युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे . पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य असणार आहे . पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार असल्याचे मनोगत वाकडकर यांनी व्यक्त केले.