Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कर्जत शहर अध्यक्ष पदी " नीरज मंगेश गायकवाड "...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कर्जत शहर अध्यक्ष पदी ” नीरज मंगेश गायकवाड ” यांची निवड !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) येणाऱ्या सर्व निवडणुकीत ” तरुण शक्ती ” आपल्या बरोबर असावी म्हणून विद्यार्थी संघटनेला अनन्य साधारण महत्व असते . विद्यार्थ्यांच्या समस्या व शैक्षणिक क्षेत्रात गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी , व शैक्षणिक क्षेत्रात चांगली पिढी घडवावी , हाच मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मा. राजिपचे उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या कर्जत शहर अध्यक्ष पदी ” कु . नीरज मंगेश गायकवाड ” यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा युवक सरचिटणीस बॉबी शेठ वाघमारे यांनी तरुणांना संबोधित करताना म्हणाले की , आजची तरुण पिढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे . शहरापासून ग्रामीण भागात विभागवार कमिटी बनवून विद्यार्थी संघटना १ नंबरवर आणा , १८ वर्षे झालेल्या तरुणांनी मतदानासाठी नाव नोंदणी करून घ्या , हिच खरी ताकद भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची , व आपले नेते सुधाकर भाऊ घारे यांची असेल , असे मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या बैठकीत कर्जत – खालापूर विधानसभाचे पक्ष नेतृत्व मा. सुधाकरशेठ घारे यांच्या आदेशाने व मा. मधुकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा युवा सरचिटणीस बॉबीशेठ वाघमारे , युवा तालुका अध्यक्ष स्वप्नील पालकर , विध्यार्थी तालुका अध्यक्ष आदेश धुळे व अनेक प्रमुख पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते .यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कर्जत शहर अध्यक्ष नीरज मंगेश गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page