![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
कार्ला (प्रतिनिधी): रुचिका क्लब मुंबई, भगवान महावीर विकलांग सहायता समिती व संपर्क संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट, कॅलिपर्स व कुबड्या वाटप, व तीन दिवसीय वैद्यकीय शिबिराचे उदघाट्न शुक्रवार दि.20 रोजी संपर्क दवाखाना मळवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी रुचिका क्लब मुंबई संस्थेचे नारायण व्यास, किरण आर्या, सुमित्रा श्रॉफ, शशी अगरवाल, रेवा अगरवाल, साधना गुप्ता, अनिता महनसारिया, रंजना सोमाणी, ज्योती जलान, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. संजय पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी केले. तर प्रदीप वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सी.ई.ओ. अनुज सिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हे शिबीर दि.20,ते दि.23 असे सलग तीन दिवस सुरु असणार आहे.सदर आयोजीत मोफत वैद्यकीय शिबिरात डॉ. नेमीचंद छाजेड यांचे (महावीर इंटरनॅशनल मेडिकल सर्व्हिस)आणि डॉ. एच. व्ही. देसाई रुग्णालय पुणे यांच्या विशेष सहकार्याने डोळे, कान, घसा आदी इंद्रियांच्या आजारावर तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच अपंगांसाठी रुचिका क्लब मुंबई आणि संपर्क संस्था भाजे यांच्या वतीने अपंगांना कृत्रिम पाय, कुबड्या मोफत देण्यात येणार आहे. शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी परिसरातील जवळजवळ तीनशे गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला.तसेच जास्तीत जास्त गरजूंनी या मोफत वैद्यकीय शिबीर व जयपूर फूट, कॅलिपर्स व कुबड्या वाटपाचा लाभ घ्यावा असे आवाहन संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी यांनी केले आहे.