रेड बुल कार्ट फाईट या देश स्तरावरील रेसिंग स्पर्धेत लोणावळ्यातील ध्रुव चव्हाण हा दुसऱ्या क्रमांकावर…

0
803

लोणावळा : रेड बुल कार्ट फाईट 2022 या स्पर्धेमध्ये भांगरवाडी येथील ध्रुव प्रशांत चव्हाण याने भारतात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या देश स्तरावरील “रेड बुल कार्ट फाईट 2022” या रेसमध्ये भांगरवाडी येथील 19 वर्षीय कुमार ध्रुव प्रशांत चव्हाण याने भारतात दुसरा क्रमांक पटकविला आहे.

ध्रुव याला लहान पणा पासून कार्ट चालविण्याची आवड होती त्याची ही आवड पूर्ण करण्यासाठी त्याचे वडील व कुटुंबीयांनी नेहमीच त्याला प्रोत्साहन दिले आहे. त्यानुसार वयाच्या 18 वर्षांपासून ध्रुव याने अजमेरा गो कार्ट रेसिंग क्लब वडाळा मुंबई जॉईन केला व वर्षभर तेथे सराव करत काही स्पर्धाही जिंकल्या आहेत.या स्पर्धा जींकल्याने त्याच्या आत्मवीश्वासात मोठी भर पडल्यामुळे ध्रुव याने अवघ्या 19 वर्ष वयात ही देश पातळीवरील ” रेड बुल कार्ट फाईट 2022″ या रेसिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकवीला आहे.

कुमार ध्रुव याने देशभरात स्वतःचे व लोणावळा व मावळचे नाव लौकिक केले असल्यामुळे या दमदार कामगिरीतून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.