लक्ष्मी पूजनाच्या दिनी बाजारपेठेत ग्राहकांची बेभान गर्दी…

0
156

लोणावळा : लोणावळा बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने गजबजली.दिवाळी निमित्त खरेदी करण्याकरिता आज लक्ष्मी पूजनाच्या दिनी लोणावळा बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. ऐन दिवाळीच्या वेळी आकाश कंदील, रांगोळी, किल्ल्यानवरील चित्रे, रंगबेरंगी पणत्या यांसर्वांनी बहरलेल्या बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे.


दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर स्थानिक प्रशासनकडून कोरोनाचे भान ठेऊन दिवाळी साजरी करण्यात यावी अशा शुभेच्छा प्रसिद्ध होत असताना दिवाळी खरेदी करताना नागरिकांना कोरोनाचे भान राहिलेले नाही असे लक्षात आले आहे. बाजारपेठेत अनेक नागरिक खरेदी करताना कोरोनाचे कुठलेही भान न ठेवता अथवा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना नागरिक बेभान बाजारपेठेत गर्दी करत आहेत.