लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे शारीरिक शोषण करणारा आरोपी लोणावळा पोलिसांच्या जाळ्यात…

0
617

लोणावळा : एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मर्जी विना जबरदस्तीने शारीरिक संबंध करणाऱ्या फरार आरोपीस लोणावळा शहर पोलिसांनी केली अटक.

इरफान इस्माईल शेख ( वय 26, रा. भांगरवाडी, लोणावळा ) असे आरोपीचे नाव असून यास लोणावळा शहर पोलिसांनी भांगरवाडी येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी हा पीडित फिर्यादी युवतीचा विश्वास संपादन करून त्याने जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत मित्राच्या भांगरवाडी रेल्वे गेट येथील फ्लॅट वर युवतीला बोलवून वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले तसेच चिंचवड येथील एका लॉजवर तिला नेवून तिच्याशी शारीरिक संबंध करत तिला मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद पीडित युवतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात केली आहे.

सदर फिर्यादेवरून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अब्दुललतीफ मुजावर, पोलीस नाईक हनुमंत शिंदे, जयराज पाटणकर, नितीन सूर्यवंशी, मनोज मोरे, स्वप्नील पाटील, अजीज मिस्त्री यांच्या पथकाने मोठया शिताफिने आरोपीस भांगरवाडी येथून ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपी विरोधात भा. द. वी. कलम 376(2)(एन),323,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अब्दुललतीफ मुजावर हे करत आहेत.