लहान मुलांना दुचाकी वाहन चालवायला देऊ नयेत ,पोलीस निरीक्षक सिताराम डुबल…

0
712

लोणावळा : अल्पवयीन शालेय विध्यार्थ्यांना तसेच आपल्या पाल्यांना वाहने चालवायला देऊ नका असे आवाहन डी वाय एस पी राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी केले.

राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये तरुणांनी आपला जीव गमावीला आहे. हे वाढते अपघात रोकण्यासाठी उपाययोजना संदर्भात लोणावळा पोलीस व सर्वपक्षीय शहराध्यक्ष यांची नुकतीच एक बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीस लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांसमवेत लोणावळा शहरातील सर्व पक्षांचे अध्यक्ष, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार उपस्थित होते. त्यावेळी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना संदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक डुबल म्हणाले की अनेक अल्पवयीन विध्यार्थी दुचाकीवरून शाळेत जात असताना दिसत आहे. त्यांच्या अल्पवयीन असल्या कारणाने पोलीस कारवाई करू शकत नाही.म्हणून पालकांनी आपापल्या मुलांना हे बंधन लावावे असे आवाहन डुबल यांनी केले आहे.

अनेक अल्पवयीन शालेय विध्यार्थी दुचाकी घेऊन फिरताना दिसत आहेत, कधी कधी तर स्वतःचे वजन पेलत नसताना दुचाकी वरून तीन तीन जन फिरताना निदर्शनास येते, काहीचे तर दुचाकी वर बसल्या नंतर पाय देखील जमिनीवर पोहचत नसल्याने अनेक मुले दुचाकी घेऊन पडल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. काहींना किरकोळ जखम होते तर काहीच्या हाता पायाला इजा होते व काही मुले तर वाहन कंट्रोल करता आले नाही म्हणून रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तींना धडकत असल्याच्या घटनाही आपण पाहतो हे अपघात जरी किरकोळ असले तरी अपघात हा अपघात असतो त्यामध्ये कधी व कुठे मार लागेल हे कोणीच ठरवू शकत नाही. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी पालकांनीच आपल्या अल्पयीन मुलांना दुचाकी न चालविण्यासाठी बंधन घालावे.