Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडलायन्स क्लब आदिवासी वाडीतील युवकांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार.

लायन्स क्लब आदिवासी वाडीतील युवकांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देणार.

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली आदिवासी वाडीतील युवावर्ग उन्नतीच्या दिशेने होणाऱ्या प्रवाह धारेपासून दुर्लक्षित राहिल्याने त्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी किंबहुना भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने, लायन्स क्लबने “ऑक्टोबर सर्विस विक” या माध्यमातून २ ते ९ ऑक्टोबर 2021 या कालावधीत “आदिवासी वाडी दत्तक योजना” राबवली आहे.

आदिवासी वाडी दत्तक योजनेत चेंबूर, वाशी, शहापूर, पेण आणि खोपोली लायन्स क्लबचा समावेश असून त्यांनी जांबरूंग, आत्करगाव, होनाड, शहापूर आणि सावरसर्ई या आदिवासी वाड्याना दत्तक घेतले आहे. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या डॉ. नरहरी किसन धोटे सभागृहात दत्तक घेतलेंल्या आदिवासी वाड्यातील युवकांसाठी उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अभ्यास शिबिराचे आयोजन केले होते.

महाराष्ट्रातील मान्यवर अशा विचारवंत आणि अभ्यासक विभूतीनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गातील युवकांना परिस्थितीनुरूप सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी यांनी बोलून दाखवला.

लायन्स क्लब खोपोलीच्या सेक्रेटरी शिल्पा मोदी, खजिनदार अल्पेश शहा, आणि इतर सर्व सदस्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी मेहनत घेतली अशी माहिती लायन दिलीप पोरवाल यांनी दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page