Wednesday, June 7, 2023
Homeपुणेलोणावळालायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड तर्फे किनारा वृद्ध आश्रमास 1 लाखांच्या वस्तू...

लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड तर्फे किनारा वृद्ध आश्रमास 1 लाखांच्या वस्तू भेट…

मावळ : लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड तर्फे कामशेत, अहिरवडे येथील किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट या आश्रमास गरज असणाऱ्या वस्तू भेट देण्यात आल्या.

किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्ट या आश्रमामध्ये अनेक वृद्ध आणि मतिमंद लोकं आश्रय घेत आहेत.या आश्रमातील आश्रयांच्या तुलनेत वापरातील काही वस्तूंची उणीव लक्षात घेवून लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड तर्फे या आश्रमास फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अंदाजे 1 लाख रुपये किमतीच्या वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडच्या या कार्याचे किनारा आश्रमाकडून भरभरून कौतुक करत आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडचे अध्यक्ष लायन अनिल गायकवाड, ट्रेझरर लायन राजेश अगरवाल, रिजन चेअरपर्सन लायन राजश्री शहा, झोन पर्सन लायन दाऊद थासरावाला, लायन प्रशांतभाई शहा, लायन वैभव गदादे, लायन योगेश गोपाळे यांच्या समवेत किनारा वृद्ध आश्रमातील अधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

You cannot copy content of this page