लायन्स क्लब लोणावळा डायमंडच्या वतीने डॉक्टरांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार…

0
47

लोणावळा : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त लायन क्लब लोणावळा डायमंड च्या वतीने लोणावळा खंडाळा आणि परिसरातील डॉक्टरांचे कौतुक व सन्मान करण्यात आले.

मानवजातीसाठी रात्रंदिवस निरंतर केलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक आणि सन्मान होणे तितकेच गरजेचे आहे. कोविड काळात या डॉक्टरांनी रुग्णांची निरंतर सेवा करून रुग्णांवर उपचार केले अशा या योद्यांना सन्मानित करणे आवश्यक असल्यामुळे जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब लोणावळा डायमंड तर्फे एकूण 7 डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निरंतर रुग्ण सेवा करणारे श्रद्धा हॉस्पिटल चे डॉ. शैलेश शहा, भांगरवाडी येथील पाटील हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. निलम पाटील, ओसवाल क्लिनिक चे डॉ. पोपट ओसवाल, डेंटल क्लिनिकचे डॉ.संजम ओसवाल, डॉ. डॉली अगरवाल इत्यादी डॉक्टरांना लायन्स क्लब लोणावळा डायमंडच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लायन्स क्लब लोणावळा डायमंडचे अध्यक्ष लायन अनंता गायकवाड,झोन पर्सन लायन दाऊद थासरावाला, संजय सोनवणे आणि क्लबचे सदस्य उपस्थित होते.