लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लोणावळा शहरात उभारण्यासाठी का लागतोय विलंब !

0
130

लोणावळा : शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणी संदर्भात गुरुवारी मातंग समाज लोणावळा शहराच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा लोणावळा नगरपरिषद इमारतीच्या आवारात उभारण्यात यावा यासाठी लोणावळा शहर मातंग समाज अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्याबाबत लोणावळा नगरपरिषदे बरोबरच आमदार शेळके यांना ही निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक 14 डिसेंबर 2011 रोजी नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा लोणावळा नगरपालिकेच्या आवारामध्ये बसवण्यासाठी सर्वानुमते ठराव पास केला होता व मातंग समाज लोणावळा शहराच्या कमिटीला सांगितले होते की आपण पुतळ्यासाठी जागा निवडून प्रशासनाला सांगावे त्या अनुषंगाने मातंग समाज लोणावळा शहराच्या शिष्टमंडळाने लोणावळा नगरपालिकेच्या शासकीय इमारतीच्या पूर्वेकडील गेटच्या बाजू कडील जागाही निश्चित केली असून याच जागी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा अशी विनंती करण्यात आली आहे.

यावेळी मातंग समाज लोणावळा शहर अध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे, उपाध्यक्ष विकास सीताराम साठे, खजिनदार उदय अशोक बोभाटे,कार्याध्यक्ष विजय वसंत साबळे, वरिष्ठ सल्लागार अशोक बोभाटे, उप सेक्रेटरी अभय लोंढे,सभासद विनोद साबळे,कृष्णा साबळे, प्रवीण मखरे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.