Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळालोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचा आनंदोत्सव साजरा करत मातंग समाजाची...

लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचा आनंदोत्सव साजरा करत मातंग समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर…

लोणावळा दि.14: लोणावळा मातंग समाजाची नवीन कार्यकारिणी जाहीर, नवीन कार्यकारिणीमध्ये सर्व पदावर युवा कार्यकर्त्यांची नियुक्ती.

मातंग समाजाची बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला आज लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील सर्व सदस्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने संपूर्ण समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणावळा शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या वतीने वारंवार करण्यात येत होती. याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी देखील लोणावळा नगरपरिषदेला याबाबत कार्यवाही करण्याची सूचना दिली होती. अनेक वर्षांच्या या मागणीला आज झालेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता मिळाली तसेच अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा लोणावळा नगरपरिषद इमारतीच्या आवारातील समूहशिल्पाच्या ठिकाणी उभारण्यात येईल असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितल्याने आज सायंकाळी मातंग समाजाच्या वतीने फटाके वाजवून अनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

आज सायंकाळी मातंग समाजाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थित नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत लोणावळा शहर मातंग समाजाच्या अध्यक्ष पदी सोमनाथ बोभाटे,उपाध्यक्ष पदी विकास साठे, कार्याध्यक्ष पदी प्रशांत खवळे, उप कार्याध्यक्ष पदी विजय साबळे, खजिनदार पदी उदय बोभाटे, उपसेक्रेटरी पदी अभय लोंढे तर संघटक पदी दिपक लाखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सेक्रेटरी व कार्याध्यक्ष पदाच्या जागा रिक्त असून त्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अशोक बोभाटे यांनी दिली आहे.

- Advertisment -