लोणावळा (प्रतिनिधी):एका डॉक्टर व्यवसायिकाच्या बंगल्यातून तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.ही घटना दि.26 रोजी मध्य रात्री अंबरवाडी गणेश मंदिराजवळ घडली.याप्रकरणी डॉ. किरण राघवेंद्र चुळकी (वय 44, मुळ रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार डॉ. चुळकी आणि त्यांचे मित्र हे दोन दिवसांपूर्वी लोणावळ्यात आले होते. तेव्हा रविवारी दिनांक 26 मार्च रोजी मध्यरात्री चोरटे बंगल्यात शिरले. त्यांनी लॅपटॉप,पाच महागडे मोबाईल संच,डेबिट कार्ड,रोकड असा एकूण 5 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे.
फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.