लोणावळा कुमार चौकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने पळविले !

0
733

लोणावळा : रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वाराने ओढून नेल्याची घटना कुमार रिसॉर्ट समोरील रोडवर मंगळवारी सायंकाळी घडली.

याबाबत फिर्यादी वंदना सतीश थोरवे ( वय 41 वर्ष , रा . रेल्वे गेट नंबर 30 , इंदिरानगर , जुना खंडाळा , लोणावळा ) यांनी मंगळसूत्र हिसकावून नेल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वंदना सतीश थोरवे या मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटून घरी जाण्यासाठी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कुमार रिसॉर्ट समोरील रोडच्या कडेला उभ्या राहून रिक्षाची वाट पाहत असताना , मोटरसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आल्या आणि मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि ते दोघेही जण खंडाळ्याच्या दिशेने फरार झाले.

या अनोळखी चोरट्यांच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी भा.द.वि. कलम 392 , 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पो.उप.नि. सुरेखा शिंदे या करत आहेत.