Saturday, October 1, 2022
Homeपुणेलोणावळालोणावळा खंडाळा येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन...

लोणावळा खंडाळा येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन…

लोणावळा दि.14: माजी विध्यार्थी संघ खंडाळा व इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड तर्फे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन संतघाडगे महाराज प्रा. शाळा खंडाळा शा. क्र.10,व प्रा. रा. मोरे. लो. न. प. माध्य. खंडाळा येथे साजरा करण्यात आला. वनपरीक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी सागर चुटके यांनी मुलांना वन्यजीव विषयावर मार्गदर्शन केले.

मुलांशी सागर चुटके यांनी संवाद व चर्चा केली आणि परिस्थिती कशीही असो पण वेळेचे महत्व काय हे मुलांना पटवून दिले,कश्या प्रकारे तुह्मी वन्यजीव पासून आपले संरक्षण कसे करावे याविषयी माहिती दिली.


सर्व विद्यार्थी चर्चा सत्रात पूर्णपणे रमून गेले होते.
यावेळी मुख्याध्यापक दिवेकर, मुख्याधपिका श्रीमती म्हाळसकर, श्रीमती सय्यद, सौं सुचेता एखे, श्री आगलावे, श्री भुरे, श्रीमती सुनीता गावडे, श्री आठरे, सौं भाले, श्री सूर्यवंशी, श्री बोरसे, अमृता पठारे अरुण इंगोले, डेबूजी झिग्रजी जानोटकर, माजी विद्यार्थी संघ खंडाळाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, राजेश महाडिक, मंगेश येवले, अशोक गवारणे, राजेंद्र ढाकोल, इंडियन स्काऊट अँड गाईड लोणावळा गिल्ड चेअध्यक्ष अशोक घाडगे,सुनिल शिंदे, रत्नप्रभा गायकवाड, पत्रकार श्रावणी कामत, आशिष जंlगीर, राठोड मॅडम, आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page