Monday, March 27, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा खंडाळा हद्दीत चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू…

लोणावळा खंडाळा हद्दीत चेन्नई एक्सप्रेसच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी):धावत्या चेन्नई रेल्वे एक्सप्रेसची धडक बसून एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना. दि.4 रोजी सायंकाळी 4:40 वा.पूर्वी लोणावळा खंडाळा रेल्वे कि. मी.125/18 दरम्यान डाऊन लाईनवर घडली.
सदर महिला ही अनोळखी असून वय अंदाजे 50 वर्ष आहे.चेन्नई एक्सप्रेसची धडक लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती लोणावळा रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एस. डी. सावंत यांनी दिली.
तसेच सदर महिला कोणाच्या ओळखीची व परिसरातील असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे. मृत महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.- शरीर बांधा सडपातळ, रंग निमगोरा, दात पुढे आलेले, कान मध्यम, कपाळ मोठे, उंची 5 फूट, चेहरा उभट, ओठ मध्यम, डोळे काळसर, नाक बसके, डोक्याचे केस लांब व काळे पांढरे तसेच मयताच्या अंगावर केसरी रंगाची साडी, काळा ब्लाउज त्यावर पांढरे वर्तुळ असलेले व चॉकलेटी रंगाचा परकर असे वर्णन आहे.

You cannot copy content of this page