लोणावळा ख्रिश्चन सेमेटरीच्या वतीने काँग्रेस कमिटी सदस्यांचा सत्कार !

0
192

लोणावळा : लोणावळा ख्रिश्चन सेमेटरी च्या वतीने लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, लोणावळा शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, संध्या खंडेलवाल, नासीर शेख, मारुती राक्षे, कार्ड कमिटी सदस्य नितीन नगरकर, अब्बास शेख इत्यादी काँग्रेस कमिटी पदाधिकारी व सदस्यांचा शॉल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभाचे आयोजन लोणावळा ख्रिश्चन सेमेटरीच्या वतीने सेंट जोजफ चर्च येथे करण्यात आले होते.यावेळी फादर ईलियाझ, ख्रिश्चन सेमेटरी कमीटीच्या सेक्रेटरी रिबेका गळे, ट्रेजरर नितीन नगरकर, फ्रांसिस कोलगे, सुनील गळे, मयूर आगरवाल, जॉय नगरकर, ग्रेगी फर्नांडिस इत्यादी सदस्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

लोणावळा शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व सदस्यांनी सन 2020 व 2021 या मागील वर्षात ख्रिश्चन सेमेटरी साठी मोलाचे कार्य केले असून ख्रिश्चन सेमेटरी साठी त्यांनी सहा लाईटचे पोल, चार बेंच, व चर्च समोरील रस्त्याचे डांबरीकरण इत्यादी कामे लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी यांच्या पाठपुराव्याने पूर्ण झाली आहेत.

उपस्थित मान्यवरांच्या स्वागतावेळी फादर ईलियाझ म्हणाले लोणावळा शहर काँग्रेसचे सर्व सदस्य यांनी वेळोवेळी सेमेटरी साठी महत्वाचे योगदान दिले आहे. कोणताही जात धर्म न बघता निस्वार्थी सेवा करत असल्यामुळे आज सर्व काँग्रेस कमिटीचा सत्कार करण्यात येत आहे. जसे सहकार्य याकाळात केले गेले असेच पुढील काळातही करावे असेही ते म्हणाले.