लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई,,, 4 कोटीसह दोघांना घेतले ताब्यात…

0
994

लोणावळा दि. 29 – रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अवैध्य रित्या पैशाची वाहतुक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चार कोटीची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

महेश नाना माने ( रा. विठा, जि. सांगली ) व विकास संभाजी घाडगे ( रा.शेटफळ , जि. सांगली ) यांना ताब्यात घेण्यात आले असून एवढी रोकड कुठे व कशासाठी आणली जात आहे यावर तपास सुरु आहे .

लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.28 रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसांना खबर मिळाली होती की मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गांवरून अवैध रोख रक्कम व शस्त्र वाहतूक होत असल्याची पक्की खबर मिळताच याची सहनिशा करण्यात साठी लोणावळा ग्रामीणचे पोलीसांचे एक नेमण्यात आले सायंकाळी 6: 00 वा.च्या. दरम्याण संशयीत कार क्र. KA-53 MB-8508 मारुती स्विफ्ट कार ही मुंबईकडुन पुण्याकडे जाताना निदर्शनास आली चालकास कार थांबवण्याचा इशारा केला असता कार न थांबवता ती पुढे निघुन जावु लागली त्यावेळी पोलीस पथकाने शिताफिने ति कार ताब्यात घेतली कार चेक करण्यात आली तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात 4 करोड रुपयाची रोख रक्कम मिळून आली.

सदर रकमेबाबत कार मधील दोन्ही इसमांना विचारपुस करण्यात आली.त्या संबंधी कोणतीही कागदपत्रे अथवा पुरावे, वाहतुक परवाना,त्याबाबतचे कारण विशेत करता व सादर करता आले नाही सदरच्या रक्कमेबाबत माहिती घेण्याचे काम चालु असुन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लपून छपून कोठुन व कशासाठी आनली या बाबतची माहीती व शोध घेण्यात येत असुन सदर प्रकरणी आयकर विभाग पुणे यांना कळविण्यात आले असून पुढिल कारवाई आयकर विभाग हे करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण मोरे , पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर , पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे , सहाय्यक फौजदार शिताराम बोकड , युवराज बनसोडे , पोलीस हवालदार अमित ठोसर , महीला पोलिस नाईक पुष्पा घुंगे, पोलीस नाईक गणेश होळकर , किशोर पवार , पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे , प्रणयकुमार उकिर्डे, होमगार्ड शिर्के ,अनिकेत इंगवले , मराठे यांनी केली आहे .