Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पोलीस पाटील, पोलीस मित्र व गगनगिरी सेक्युरिटी चा सत्कार…

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पोलीस पाटील, पोलीस मित्र व गगनगिरी सेक्युरिटी चा सत्कार…

लोणावळा (प्रतिनिधी):ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील, सिंहगड इस्टिट्युत चे एन. एस. एस. विध्यार्थी व गगनगिरी शेक्युरिटी सर्व्हिस यांचा लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणूक व 31 डिसेंबर रोजी पोलिस बंदोबस्तास सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस पाटील,सरपंच,सिंहगड एन. एस.एस.चे विद्यार्थी,गगनगिरी सेक्युरिटी यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
लोणावळा विभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आले होते.
पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो . गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो म्हणून पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्यावतीने लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटलांचा व पोलीस मित्र तसेच गगनगिरी सेक्युरिटी सर्व्हिस यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी पोलीस पाटील संजय जाधव ,शहाजहान इनामदार ,ह भ प अनंता शिंदे, अनिल पडवळ ,राहुल आंबेकर, गुरुनाथ मांडेकर , विनोद बेंगळे ,दिपाली विकारी, उज्वला अंभोरे , सचिन भोरडे,अनंता खैरे, नामदेव डोंगरे, सीमा यादव, राजश्री कचरे, वैशाली काळे, अर्चना येवले, प्रतीक पिंगळे, मयूर गरुड, मीरा खांडेभरड, नीता शिंदे, सुनील कालेकर,साबळे, रुपाली पटेकर आदी सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. यांबरोबरच पोलीस मित्र ,सिक्युरिटी सर्व्हिस व सिंहगड इन्स्टिटयूट चे एन.एस.एस.चे विद्यार्थी तसेच पत्रकार विशाल पाडाळे,अध्यक्ष पत्रकार विशाल विकारी,पत्रकार संदीप मोरे, पत्रकार बंडू येवले,अध्यक्ष पत्रकार संजय पाटील आदिजण उपस्थित होते
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश धानिवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक व किशोर धुमाळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्राचार्य बापूलाल तारे सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी नितेश कवडे व धनवे आदींनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page