Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई खारघर येथून चोरी झालेली दुचाकी वरसोली टोल नाका...

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई खारघर येथून चोरी झालेली दुचाकी वरसोली टोल नाका येथून हस्तगत…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोल नाका येथे खारघर येथून चोरी केलेल्या मोटारसायकल सह अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वरसोली टोल नाका येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून नियमित वाहनांची तपासणी केली जाते. त्याचा अनेक पर्यटकांना त्रास होत असला तरी या तपासणी दरम्यान अनेक फरार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस व होमगार्ड हे दि. 4 मार्च रोजी वरसोली टोल नाका येथे आपले कार्य बजावत असताना दुपारच्या दरम्यान एक अल्पवयीन तरुण प्रवास करताना संशयास्पद आढळून आला त्याला थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून कुठलेही सकारात्मक उत्तर मिळाले नसल्याने त्याची अधिक विचारपूस केली असता सदर बजाज सी टी 100 कंपनीची क्र. MH 46 AT 1608 ही दुचाकी खारघर हद्दीतून चोरी करून आणल्याचे समोर आले. या अल्पवयीन आरोपीला खारघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक फौजदार बनसोडे, पोलीस नाईक भूषण कदम, पोलीस कॉन्स्टेबल . विनोद गवळी,कुदळे, होमगार्ड अनिकेत इंगवले, सागर कुंभार, शिर्के यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

You cannot copy content of this page