Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहेरगाव हद्दीतील गावठी हातभट्टी उध्वस्त करत 80 हजाराचे रसायन...

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहेरगाव हद्दीतील गावठी हातभट्टी उध्वस्त करत 80 हजाराचे रसायन केले नष्ट…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलीसांनी वेहेरगाव येथील गावठी हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई करून तब्बल 80 हजार किंमतीचे 1600 लिटर कच्चे रसायन नष्ट केले.यातील फरार आरोपी नेताराम धरम सिंग राठोड याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) (फ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेहेरगाव हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बिगर परवाना गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर कारवाई करून हातभट्टी उध्वस्त करीत 80 हजार रुपये किमतीचे 1600 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.यातील फरार आरोपी नेताराम धरम सिंग राठोड याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत केतन महादु तळपे (पोलीस कॉन्स्टेबल, लोणावळा ग्रामीण पो.स्टे.) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5.45 वाजता वेहेरगाव हद्दीत देवकर वस्ती जवळ असणाऱ्या कंजार भट वस्ती येथील माळ रानात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी नेताराम धरम सिंग राठोड (वय 40 वर्ष, रा. कांजार भट वस्ती, वेहेरगाव, तालुका मावळ) हा त्याच्या घराजवळ बेकायदा गावठी हातभट्टीची दारू तयार करताना पोलिसांना मिळून आला.
त्यावेळी त्याच्याकडे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे प्रत्येकी 200 लिटरच्या 08 प्लास्टिक ड्रम मधून भरलेले एकूण 1600 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. या रसायनाची किंमत प्रत्येकी 50 रुपये लिटर प्रमाणे एकूण 80 हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. कारंडे, पो.उप.नि. भोसले, पो. हवा. सकपाळ, मुंडे, पो. ना. गणेश होळकर, पो. कॉ. केतन तळपे, खैरे यांनी सदरची कारवाई केली आहे.पुढील तपास पोलीस नाईक गणेश होळकर हे करत आहेत.

You cannot copy content of this page