लोणावळा ग्रामीण पोलिसांची “ऑपरेशन नो मास्क अगेन ” ला सुरुवात…

0
1099

लोणावळा : विना मास्क फिरणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलीसांची करडी नजर आहे.
वरसोली टोल नाका येथून विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाने निर्बंध लागू केले असून विना मास्क फिरणाऱ्यांवर लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून प्रत्येक दिवशी हद्दीतील कार्ला, मळवली, पवना नगर, वरसोली टोल नाका या परिसरात ” ऑपरेशन नो मास्क अगेन “ही कडक कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

मागील दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोना निर्बंधाचा अनुभव घेतलेला आहे. तरीही नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडावे.नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेतल्यास पोलीस प्रशासनास आक्रमक भूमिका घ्यावी लागणार नाही. त्यामुळे स्वतः तोंडाला मास्क लावावे , गर्दीची ठिकाणे टाळावीत व शासकीय निर्बंधाचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.

लोणावळा शहरात देखील विना मास्क फिरणाऱ्यांवर नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस यांच्या मार्फत विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.विना मास्क फिरणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण दिल्या सारखे आहे.म्हणून सावध रहा आणि मास्क लावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका.