लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 41 हजाराच्या मुद्देमालासह घेतले एकास ताब्यात…

0
430

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नेत्र दिपक कारवाई कार्ला फाट्यावर दुचाकीच्या डिक्कीतून गुटखा घेऊन जाणाऱ्या इसमास मुद्देमालासह घेतले ताब्यात.

कमलेश भोलाराम रात राठोड ( वय 32, रा. छावा चौक कामशेत, मावळ ) याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुटखा व दुचाकी असा 41 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दुचाकी गाडी क्र . ( MH 14 JB 2841 ) वरून एक जण गुटखा घेऊन कामशेतच्या दिशेने जात असल्याची खात्री शीर माहितीच्या आधारे कार्ला फाटा येथे ग्रामीण पोलिसांनी सदर दुचाकी आडवून तपासणी केली असता , दुचाकीच्या डिक्कीमध्ये विक्रीसाठी चालविलेला 6 हजार 28 रुपयांचा गुटका व पान मसाला जप्त करण्यात आला आहे . तसेच 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

याप्रकरणी पोलीस नाईक शरद जाधवर यांनी सरकारी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर पुढील तपास करत आहेत.