Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडलोणावळा जनआक्रोश मोर्च्या बाबत आर. पी. आय. (A) ची भूमिका..

लोणावळा जनआक्रोश मोर्च्या बाबत आर. पी. आय. (A) ची भूमिका..

लोणावळा (प्रतिनिधी )- सध्या मावळ तालुक्यातील सामाजिक परिस्थिती ही खुप खालावली असुन समाजा मध्ये तेढ, द्वेश पसरवला जात आहे ,इकडे कोन भिंत सरकवण्याच्या बाता करतायत तर कोन बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा पाईक मीच आहे हे दाखवून देण्यासाठी अट्टाहास चालू आहे ,पण हे ज्याचे त्याचे स्वार्थी राजकारण आहे, हे तरूणांनी जाणून घेतले आहे.

पण आज पर्यंत कोणीच ही भुमिका घेतली नाही की ,जर चार वर्षांपूर्वी रुग्णालयाचे काम सुरू झाले तर तेव्हा जागेचे मोजमाप (लाईन आवूट ) करण्याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची होती. त्या नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे शुशोभिकरणाचे काम सुरू झाले,तेव्हाही जागेचे मोजमाप (लाईन आवूट) करण्याची जबाबदारी ही देखील शासकीय यंत्रणेचीच होती.
पण आज दोन्हीही कामे अंतिम टप्प्यात आली असताना रुग्णालय व बाबासाहेब यांचा पुतळा भिंत यामधील अंतर कमी आहे असे सांगून तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपापसात भांडायला कोन लावतय ? तर हीच शासकीय यंत्रणा ,ह्या शासनाच्या आधिका-यांच्या चुका आहेत ,तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य करणे, शासकीय कामात कसुर करणे, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास जाणून बुजून अडथळे निर्माण करणे,(अपमान करणे) तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे असे गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) चे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी आज लोणावळा येथे आयोजित जन आक्रोश मोर्चात आपली भूमीका स्पष्ट करताना केली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा दिपकभाऊ निकाळजे या पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुशभाऊ चव्हाण, मावळ तालुकाध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ,मावळ तालुका युवक अध्यक्ष दिनेशभाऊ शिंदे व सर्व मावळ तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या वतीने करत आहोत.
- Advertisment -

You cannot copy content of this page