Tuesday, September 26, 2023
Homeक्राईमलोणावळा टेबल लँड येथून होंडा ऍक्टिव्हा लंपास,शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात...

लोणावळा टेबल लँड येथून होंडा ऍक्टिव्हा लंपास,शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल..

लोणावळा (प्रतिनिधी):लोणावळा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जी. वार्ड, टेबल लँड येथून ऍक्टिव्हा कंपनीची 10,000 रु. किंमतीची मोटरसायकल चोरट्याने लंपास केल्याची घटना दि.30 ऑगस्ट रात्री 9:00 ते 31 ऑगस्ट पहाटे 5:00 वा.च्या सुमारास घडली.
याबाबत नईम इब्राहिम म्हाते (वय- 52 वर्षे, धंदा- खाजगी व्यवसाय, रा. जी वार्ड टेबल लॅन्ड लोणावळा ता.मावळ जि. पुणे) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात भा. द.वी.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी नईम म्हाते हे त्यांच्या व्यवसायावरून दि.30 रोजी रात्री 9:00 वाजता टेबल लँड येथील घरी आले व घरासमोरील मोकळ्या मैदानात त्यांची होंडा ऍक्टिव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची मोटरसायकल क्र.MH-14-DZ-3414 ही उभी करून घरात झोपी गेले. तसेच दि.31 रोजी पहाटे 5:00 वाजण्याच्या सुमारास जागे झाले असता घरासमोरील मोटरसायकल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला व शहरात सर्वत्र शोध घेतला असता मोटरसायकल कुठेही मिळून आली नाही.
त्यामुळे कोणी तरी अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून स्वतः च्या फायद्यासाठी चोरून नेली असल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. सदर फिर्यादे वरून लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या आदेशानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण उंडे करत आहेत.
- Advertisment -