Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा तुंगार्ली परिसरात अंगावर भिंत पडून 18 वर्षीय मजुराचा मृत्यू…

लोणावळा तुंगार्ली परिसरात अंगावर भिंत पडून 18 वर्षीय मजुराचा मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी): भिंत पाडत असताना, भिंत अंगावर पडल्याने गंभीर जखमी होऊन एका 18 वर्षीय परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणावळा तुंगार्ली येथे दि.8 रोजी दुपारी 12:30 वा. च्या सुमारास घडली.
या प्रकरणी महातम अशोक कुमार (वय 24 वर्षे रा. बिशनपूर,पो.स्टे ता.हरनई, जि.गोरखपूर, राज्य उत्तर प्रदेश,सध्या रा. केवरे ता. मावळ )यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.विनय अशोक कुमार ( वय 18 ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्याचे इतर दोन भाऊ असे तिघेजण दि.8 रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 09.00 वा. तुंगार्ली येथील कोणार्क पॅराडाईज येथे काम करण्यासाठी आले.ते भींत तोडण्याचे काम करीत असताना दुपारी 12.15 वा.चे सुमारास अचानक विनय अशोक कुमार याच्या अंगावर भींत पडून तो जखमी झाला त्याला उपचारासाठी संजीवणी हाँस्पीटल येथे दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार मडके करत आहेत.

You cannot copy content of this page