लोणावळा नगरपरिषदेच्या नगरसेविका आरोही तळेगावकर व नगरसेवक भरत हारपुडे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश….

0
609

मुंबई : लोणावळा नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगरसेविका आरोही तळेगावकर, भाजप चे विद्यमान नगरसेवक भरत हारपुडे व भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते गणेश इंगळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंतरावजी पाटील, ग्रामविकास मंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळा नगरपरिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक भरत हारपुडे, विद्यमान नगरसेविका आरोही तळेगावकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष गणेश इंगळे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, देहूगावचे माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे, उद्योजक भरत काळोखे, अमोल काळोखे यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह मुंबई प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, लोणावळा व देहू शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.