लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र.3 च्या दुरावस्थाबद्दल लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक…

0
72

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विदयालय शाळा क्र.3 च्या इमारतीच्या झालेल्या दुरावस्थेमुळे लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस व पालक वर्गामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून लवकरच या शाळेच्या इमारतीची डागडुजी व्हावी अन्यथा नवीन इमारत बांधण्यात यावी असे निवेदन लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

लोणावळा नगरपरिषद शाळा क्र .3 ची इमारत जरी जुनी असली तरी त्यामध्ये ऊर्दु माध्यमिक विदयालय 130 व मराठी माध्यमातून 300 तर मतिमंद संवाद शाळेत 40 विध्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्वांचे आरोग्य धोक्यात असून ताबडतोब प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषदेची लोणावळा शहरात अनेक माध्यमिक विद्यालये असून त्यातील शाळा क्र.3 भांगरवाडी या विद्यालयाच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालक वर्ग व लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


सदर इमारतीची डागडुजी करण्यात यावी यासाठी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अल्प संख्यांक तालुका उपाध्यक्ष रिजवान खान, लोणावळा शहर प्रवक्ता फिरोज शेख, लोणावळा शहर विद्यार्थी अध्यक्ष आदित्य पंचमुख, सामाजिक न्याय विभाग मावळ तालुका कार्याध्यक्ष अमोल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नितेश मुरलीधर जाधव यांनी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना या संदर्भात निवेदन दिले आहे . तसेच शाळेची डागडुजी होत नसेल तर नवीन इमारत बांधण्यात यावी असेही यावेळी निवेदन कर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.