Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद शिक्षकांची शाळा पूर्व तयारी कार्यशाळा संपन्न…

लोणावळा नगरपरिषद शिक्षकांची शाळा पूर्व तयारी कार्यशाळा संपन्न…

लोणावळा : शाळा पूर्व तयारी याबाबत लोणावळा नगरपरिषदेच्या शालेय शिक्षकांची शैक्षणिक परिषद लोणावळा नगरपरिषद शाळा क्र.1 येथे दि.26 रोजी संपन्न झाली.
या शैक्षणिक परिषदेस नगरपालिका शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. जालिंदर जाधव सर, टाक मॅडम यांनी ही परिषद घेतली. या शैक्षणिक परिषदेत परिसरातील शाळेतील भौतिक सुविधा,शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा, समाज भिमुख शिक्षण पद्धती, शाळेतील केलेल्या कार्याची जाहिराती, गुणवत्ता वारी नुसार केलेल्या उपक्रमाची माहिती, तसेच शैक्षणिक 71 मुद्द्द्यावरती चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेचे आयोजन प्रशासन अधिकारी लोणावळा नगरपरिषद यांच्या सूचनेनुसार शाळा क्रमांक 6 च्या मुख्याध्यापिका नंदा तांदळे यांनी केले होते. शाळा क्रमांक एक च्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, तसेच दोनच्या मुख्याध्यापिका प्रतिभा दरेकर मॅडम यांच्या सहकार्याने आजची शिक्षण परिषद संपन्न झाली.
- Advertisment -

You cannot copy content of this page