![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा : अयोध्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा प्रथम वर्धापन दिनानिमित्त पांगोळी, लव्हाळवाडी येथे येत्या 22 जानेवारी बुधवार रोजी करण्यात येणार आहे विविध सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पांगोळी, लव्हाळवाडी येथील सुमंता मारुती इंगुळकर, सचिन बंडू बोके, शिवराज तुकाराम आसवले,संतोष गोपाळ ढाकोळ,कु. ओंकार विलास बोके व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत असून या कार्यक्रमासाठी हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष,विराट हिंदू गर्जना धर्मधुरंधर हिंदुतेजसूर्य मा. धनंजयभाई देसाई हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
यावेळी सकाळी मारुती रायचा अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सत्यनारायण महापूजा, सुस्वर भजन व सायंकाळी कृष्णा पांडुरंग जांगळे (खालापूर, रायगड ) यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सर्व गोरक्षकांचा तसेच श्रीमप्रायगीरी प्रतिष्ठान (गड किल्ले संवर्धन संस्था), हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल, गोवंश सुरक्षा समिती खालापूर आदींचा सन्मान चिन्ह देऊन उपस्थित वरिष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. आणि रात्री महाप्रसाद (भंडारा ) तसेच भजनाने या भव्यदिव्य कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते अक्षय बाळू अंभुरे, सागर बाबुराव कराळे, पंकेश शिवाजी ढाकोळ, अक्षय कांबळे, सोम पवार, सुजन पिलाणे, पवन इंगुळकर, अनिल शंकर कोंडभर, संजय इंगुळकर, योगेश गोसावी, रुपेश गोसावी, साहिल नंदकुमार कांबळे, सुभाष विष्णू इंगुळकर,सुरज शांताराम खांडेभरड, शुभम संतोष शिर्के, शेखर सुरेश मिंडे, निलेश महादू गोसावी, गणेश लक्ष्मण तोडकर, बाजीराव ज्ञानदेव पिलाणे, कल्पेश खांडगे,सदानंद नारायण पिलाने, मंगेश भुरूक,संतोष शिर्के आदीच्या सहकार्याने दि. 22 जानेवारी रोजी पांगोळी, लव्हाळवाडी येथील मारुती मंदिर येथे कार्यक्रम अगदी थाटामाटात संपन्न होणार आहे.