लोणावळा पुणे लोणावळा लोकल मध्ये तीनची वाढ,त्यानुसार एकूण अकरा लोकल धावणार !

0
904

लोणावळा : लोणावळा पुणे लोणावळा अधिक तीन लोकल सुरु करण्यासाठी मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे .

कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे हा महत्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला असल्याचे पत्रक मध्य रेल्वे पुणे विभागाचे वरिष्ठ डी ओ एम स्वप्नील निला यांनी प्रसिद्ध केले आहे.

तसेच शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करत शाळा, महाविद्यालये व अस्थापना पुर्ववत सुरु केल्या असल्यामुळे लोणावळा पुणे लोणावळा लोकल सेवा पुर्ववत सुरु करण्याची मागणी लोणावळ्यातील अनेक संघटना, पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघटना तसेच माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली होती .आता लोणावळा पुणे लोणावळा लोकल मध्ये अधिक तीन ची वाढ झाल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सध्या लोणावळा पुणे लोणावळा मार्गावर लोकलच्या आठ गाड्या धावत होत्या त्यामध्ये आता तीनची भर पडली असून आता एकूण 11 लोकल धावणार आहेत.

यानुसार पुणे ते लोणावळा दरम्यान गाडी क्र . 1556 ही पुण्याहून सकाळी 5.45 वाजता सुटेल , गाडी क्र . 1562 ही 9.55 वाजता व 1570 ही सायंकाळी 5.15 वाजता सुटेल . तर लोणावळा पुणे दरम्यान लोणावळ्यातून गाडी क्र.1555 ही सकाळी 7.25 वाजता , गाडी क्र . 1561 ही दुपारी 2.50 वाजता पुणे स्टेशन पर्यंत सुटेल तर 1569 ही सायंकाळी 7.00 वाजता शिवाजीनगर अशा प्रकारे स्टेशन पर्यंत जाणार आहे . याव्यतिरिक्त पुर्वीच्या गाडया वेळेत धावतील. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मान्यत्ये नुसार आता लोणावळा पुणे लोणावळा दरम्यान लोकलच्या अकरा गाड्या धावतील धावणार आहेत.