Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळालोणावळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तब्बल पाच गुन्हे उघडकीस, सात जण ताब्यात…

लोणावळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तब्बल पाच गुन्हे उघडकीस, सात जण ताब्यात…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांनी जबरी चोरीचे तीन व चोरीचा एक गुन्हा तसेच बंडगार्डन पोलीस ठाणे पुणे शहर कडील चोरीचा एक गुन्हा असे एकुण 5 गुन्हे उघडकीस आणले असून याप्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर गुन्ह्यातील 1) चिंतन लक्ष्मण पाठारे (वय 19 वर्षे रा. ओळकाईवाडी लोणावळा ता.मावळ जि.पुणे) 2) शेखर मारुती मंजुळे (वय 19 वर्षे, रा. केवरे कुसगाववाडी ता.मावळ जि.पुणे) 3)आकाश भरत ओहाळ (वय 24 रा. केवरेगाव ता.मावळ जि.पुणे) 4) सबरोज अहमद निहाज अहमद मुजावर (वय 24 वर्षे, रा. डोंगरगाव ता. मावळ जि.पुणे )5) रफिक शमशेर पठाण (वय 25 वर्षे, रा. देवणी जि.लातूर) 6) रविशंकर रामदास गौतम (वय 30 वर्षे, रा.कानपूर,सध्या रा. वलवण ब्रिज जवळ लोणावळा ता. मावळ जि.पुणे) 7) निखील महेंद्र निकाळजे (वय 26 वर्षे, रा. नांगरगाव लोणावळा ता.मावळ जि.पुणे) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला एकूण 52,200 रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हयात आरोपीतांनी वापरलेली एकुण तीन वाहने 3,60,000/- रु. किं.असे हस्तगत करण्यात आली आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पोवार, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, सहाय्यक फौजदार सुनिल वाणी, पोलीस हवालदार मयुर आबनवे, चालक पोलीस नाईक फरांदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मदने, पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोरे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील पाटील, रमेश उगले, विरसेन गायकवाड यांनी सदर धडकेबाज कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page