लोणावळा मनसे च्या वतीने हनुमान जयंती निमित्त हनुमान चालीसा वाचन…

0
61

लोणावळा 17 : हनुमान जयंती निमित्त लोणावळा गावठाण येथील हनुमान मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामुदायिक हनुमान चालिसा वाचन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान जयंती निमित्त हनुमान चालिसा वाचन करण्याच्या सूचना मनसे सैनिकांना दिल्या होत्या . यानुसार आज लोणावळ्यात मनसे सैनिकांनी सामुदायिक चालिसा वाचन केले .

यावेळी माजी शहराध्यक्ष सुशील पायगुडे , मंगेश खराडे , अनिल कडू , विद्यमान शहर आध्यक्ष भारत चिकणे , अभिजीत फासगे , दिनेश कालेकर , मधुर पाटणकर , विद्यार्थी सेना अध्यक्ष अक्षय जाचक , संदीप पोटफोडे , सनी अंभोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.