लोणावळा येथे जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेचा संयुक्त जयंती मोहत्सव संपन्न…

0
85

लोणावळा दि.11: जोशाबा मजूर कष्टकरी संघटनेच्या वतीने लोणावळा येथे महामानवांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.सदर जयंती निमित्त सर्व क्षेत्रातून विशेष कार्य करणाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा.शिक्षण मंत्री प्राध्यापक लक्षमणराव ढोबळे, पद्मश्री लक्ष्मण माने, व्याख्याते सोमनाथ गोडसे, भटका विमुक्त संघटनेचे अध्यक्ष माऊली सोनवणे, भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ नेते मधुकर भालेराव, बाळकृष्ण टपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना ढोबळेसर यांनी सांगितले की शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण आपल्या पाल्याला कंपासपेटी ही कमी पडू देणार नाही असा संकल्प आज केला पाहीजे.आपली मुले ही पुढे जावून मोठे आधिकारी कसे होतील याचा विचार डोक्यात घेवूनच ध्येय ठेवले पाहीजे.तसेच लक्ष्मण माने यांनी देखील साध्या भाषेत विमुक्त समाज आपल्यामध्ये जास्त प्रमाणात का सामिल होत नाही, याची परखड कारणे मांडली.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्याना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी 2022 वर्षाचा जोशाबा सन्मान हा पुरस्कार सौ कल्याणी लोखंडे यांना प्रदान करण्यात आला,


कार्यक्रर्माचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष आंकुशभाऊ चव्हाण यांनी केले त्या वेळी ते म्हणाले की एक मजुरी करणाऱ्या, मच्छीमारी करणा-या,काचपत्रा वेचणा-या वर्गासाठी, हे स्वतंत्र विचारपिठ असुन मि ही तुमच्यातलाच एक असुन चांगल्या विचाराच्या लोकांबरोबर राहिल्याने, काम केल्याने, व या संघटनेमुळे माझ्यासारखा एक मजुर आज या जयंती सोहळ्यात सुट बुट घालुन येतोय हाच बदल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपेक्षित होता,आणि तोच बदल करण्याच्या दृष्टीने ही संघटना काम करत असून हा बदल लगेच होणार नाही, पण पुढची पिढी नक्कीच बदलेल, याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षण हे असुन,बौद्ध समाजाकडे पाहिल्यास आपणास लक्षात येईल.

जर बौध्द समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने, त्यांनी दाखवलेल्या संन्मार्गाने जावून आपला विकास करून घेतो मग आपण का मागे राहायचे ? हा बद्दल हळूहळू होईल पण नक्की होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.यावेळी आर पी आय चे जिल्हाध्यक्ष विकास साळवे, लोणावळा शहराध्यक्ष महेंद्र शिंदे,जे.के.गरड, किसन आहिरे, बबनराव ओव्हाळ इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थित लाभली तर यावेळी उपाध्यक्ष नामदेव राठोड, सचिव सागर साबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ, मावळ तालुका अध्यक्ष रमेश ओव्हाळ, उपाध्यक्ष किशोर वंजारी, कार्याध्यक्ष दिनेश शिंदे, सचिन साबळे, विनोद साबळे, अक्षय गुजर, लक्ष्मण राठोड, वैभव आहीरे, आदी मान्यवरांबरोबर हजारो नागरिकांनी जयंती उत्सव निमित्त आनंद व्यक्त केला.