![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यात ॲड बापुसाहेब भोंडे हायस्कूल येथे नुकतीच “मावळ एकता कला मंच” आयोजित भव्य नृत्य स्पर्धा 2022 संपन्न झाली.
साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्य संपादक ॲड संजय पाटील आणि एम पी एन न्यूजचे सागर शिंदे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सोनी मराठीचे महाराष्ट्राज बेस्ट डान्सर दिपक हुलसुरे यांनी काम पाहिले.यास्पर्धेला मावळ बरोबरच पुणे,लातूर,मुंबई,कल्याण,पेन आणि नेपाळ हून सुद्धा स्पर्धक आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून लोणावळा नगरपरिषदेकडून स्वच्छ्ता बाबत शपथ घेण्यात आली.
यावेळी माजी उपनगराध्यक्षा सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,प्रमोद गायकवाड,भरत हरपुडे,विजय उर्फ पोपट मोरे,अंजना कडू,जेष्ठ नागरिक संघाचे पांडुरंग तीखे,मृदुला पाटील, रोटरियन उदय पाटील,गोरख चौधरी, बापूसाहेब पाटील,उमा मेहता,राजेश मेहता संयोजक संजय पाटील,सागर शिंदे,सूरज,साई आणि दिपक हलसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमातील विजेत्यांना रोख 37 हजाराचे बक्षीस देण्यात आले. सदर बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बारणे आणि गायत्री रिले यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमातील स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ॲड संजय पाटील यांनी प्रास्तविक केले त्यात त्यांनी लोणावळ्यात सर्व सोयीनी युक्त सांस्कृतिक भवन असावे अशी मागणी उपस्थित मान्यवरांकडे केली आणि त्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले तर सागर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.परीक्षक म्हणून दिपक हलसुरे यांनी उत्तम परीक्षण करून परफॉर्मन्स सादर करून नृत्य प्रेमिंची मने जिंकली.