Thursday, June 1, 2023
Homeक्राईमलोणावळा येथे सेक्स रॅकेट चालवणार्‍याला पोलिसांनी केली अटक..

लोणावळा येथे सेक्स रॅकेट चालवणार्‍याला पोलिसांनी केली अटक..

लोणावळा दि.9: लोणावळा परिसरामध्ये व्हाँट्सअप माध्यमातून ग्राहकांना फोटो पाठवून मुलींचे दर ठरवून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका युवकास दहशत वाद विरोधी कक्ष व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून घेतले ताब्यात. लोणावळा परिसरातील ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे मुलींचे फोटो दाखवून दर ठरवून वाहनातून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवल्या जात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिल्याने दहशतवाद विरोधी कक्ष पथक पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी बनावट ग्राहका द्वारे सापळा रचून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या जय उर्फ धनंजय कातवारू राजभर( वय ३७ वर्ष, सध्या राहणार नांगरगाव लोणावळा, मूळ राहणार टिळक नगर चेंबूर,मुंबई ) यास ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या बातमीनुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहका द्वारे जय उर्फ धनंजय यांच्याशी व्हाँट्सअप वर संपर्क केला असता. त्याने व्हाँट्सअप वर वेश्याव्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो वरसोली लोणावळा येथे घेऊन येतो असे कळल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.

लोणावळा ग्रामीण पोलीस पथक व दहशतवाद विरोधी कक्ष यांच्या पथकाने वरसोली जवळ सापळा रचला त्यानंतर जय उर्फ धनंजय हा टोयाटो कोरोला गाडीमधून दोन मुली घेऊन तेथे आला त्याची खात्री सापळा लावून बसलेल्या पोलीस पथकाला पटल्यानंतर पोलीस पथकाने जय उर्फ धनंजय यास ताब्यात घेतले व गाडीमध्ये वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दिल्ली येथील दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे. जय उर्फ धनंजय हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे काम करतो अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.


सदर महिलेचा शोध सुरू असून अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.सदर कामगिरी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पोलीस हवालदार ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस सुजाता कदम, पुनम गुंड तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे युवराज बनसोडे, पुष्पा घुगे, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page