Friday, December 8, 2023
Homeक्राईमलोणावळा रेल्वे ब्रिजवर सफाई कामगार महिलेला मारहाण, एका विरोधात गुन्हा दाखल...

लोणावळा रेल्वे ब्रिजवर सफाई कामगार महिलेला मारहाण, एका विरोधात गुन्हा दाखल…

लोणावळा (प्रतिनिधी): पार्किंग मध्ये कचरा टाकण्याच्या वादातून लोणावळा रेल्वे स्टेशन येथील महिला सफाई कामगाराला मारहाण करून जखमी केल्याची घटना बुधवार दि.12/10/2022 रोजी लोणावळा भाजी मार्केट बाजूच्या रेल्वे ब्रिजवर घडली.
याबाबत फिर्यादी अलका राजू साबळे (वय 38 वर्ष, व्यवसाय नोकरी, सफाई कामगार, लोणावळा रेल्वे स्टेशन, रा. करंजगाव, कामशेत, ता. मावळ ) यांनी लोणावळा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून लोणावळा पोलिसांनी आरोपी सचिन एकनाथ पवार (वय 35, रा. आपटी, ता. भोर, जि. पुणे ) याच्या विरोधात गु. रजि.नं.152/2022 भा.द.वि. क. 326, 504 प्रमाणे गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा प्रथम अहवाल मा.न्यायालयात रवाना करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी सचिन एकनाथ पवार याने आज सकाळी 10: 45 वा च्या सुमारास लोणावळा गावच्या हद्दीत मार्केट बाजुच्या रेल्वे तिकीट घराशेजारील रेल्वे ब्रिजवर फिर्यादी हे साफसफाई करत असताना काहीवेळा अगोदर रेल्वे पार्किंगमध्ये कचरा टाकल्या वरून फिर्यादी यांनी हटकल्याने रागातून त्याच्या जवळील पांढरे पिशवीमध्ये लोखंडी कोयता ठेवुन फिर्यादी यांना मारहाण केली आहे. त्यामध्ये फिर्यादी यांच्या डाव्या खांद्यावर व डाव्या डोळ्याच्या खाली नाकावर फॅक्चर झाले असल्यावरून गुन्हा रजिस्टरी दाखल करून पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पोवार हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page